खडसे सर मी अजून जिवंत आहे, लवकरच तुम्हांला उत्तरही देईन – मनिष भंगाळे

Update: 2019-07-03 14:43 GMT

भाजपचे ज्येष्ठ नेते (Eknath Khadse) एकनाथ खडसे यांचे आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्या पत्नीचं दूरध्वनीवरून संभाषण झाल्यासंदर्भात आरोप करत हॅकर मनिष भंगाळे ने खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर खडसेंनी अनेकदा आपल्यावरील आरोपांचं खंडनही केलंय. राज्य विधिमंडळाचं शेवटचं अधिवेशन २ जुलै रोजी संपन्न झालं. त्या अधिवेशनात खडसेंनी आपल्या मनातील विविध प्रश्नांना मोकळी वाट करून दिली. त्यात कथित हॅकर भंगाळेंनं आरोप केले त्यानंतर तो गायब झाला, तो जिवंत आहे की नाही याविषयी मला काही माहित नाही, असं वक्तव्यं केलं होतं. त्यावर मनिष भंगाळेनं मॅक्स महाराष्ट्रवरील बातमीचा संदर्भ देत ट्विट करत,’सर मी अजून जिवंत आहे, लवकरच तुम्हांला उत्तरही देईन’ असं प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळं आता (Eknath Khadse) खडसे विरूद्ध कथित हॅकर भंगाळे असं शाब्दिक युद्ध पुढच्या काळात बघायला मिळण्याची शक्यता आहे...

Similar News