मी विधान परिषदेत जायला तयार - एकनाथ खडसे

Update: 2020-03-15 06:10 GMT

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत घेण्याचं आश्वासन दिलं आहे, आपली विधान परिषदेत जाण्याची तयारी आहे, मी त्याची वाट पाहत आहे असे विधान भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव येथील एका पत्रकार परिषदेत केलं आहे. एकंदरीत आता एकनाथ खडसेना विधान परिषदेत जाण्याचे संकेत मिळाले असल्याने त्यांनी राज्यसभा व एकूणच भाजपांतर्गत राजकारणाविषयी जास्त बोलण्याचं टाळलं.

एकाच घरात दोन खासदार नको म्हणूनच मला उमेदवारी दिली नाही अशी कबुलीच एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपचे जेष्ट नेते एकनाथ खडसे आज मुंबईहुन जळगाव येथ आले होते, राज्यसभेची उमेदवारी डावलण्यात आल्याने खडसे नेमके काय बोणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होत. पत्रकारांशी अनौपचारीक चर्चा केली.

राज्यसभेत उमेदवारी दिली असती तर एकाच घरात दोन खासदार झाले असते, पक्ष ते देऊ शकत नाही, याची आपल्याला कल्पना होती म्हणून राज्यसभेच्या उमेदवारीचा प्रश्नच नव्हता अस खडसेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

Similar News