पत्रकार नालायक आहेत - अभिजीत बिचुकले

Update: 2019-10-11 18:16 GMT

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणारे अभिजीत बिचुकले सध्या वरळी मतदारसंघात निवडणूकीसाठी उभे आहेत. या मतदारसंघात आदित्य ठाकरे देखील उभे आहेत.

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आत्तापर्य़ंत अनेक निवडणूका लढवल्या आहेत. त्यांनी साताऱ्यात उदयनराजेंना देखील कित्येक वेळा निवडणुकीच्या निमित्तानं खुलं आव्हान दिलं आहे.

असे अभिजीत बिचुकले मॅक्समहाराष्ट्राच्या ‘टू द पॉईंट’ कार्य़क्रमात आले असता महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, वरळी मतदारसंघातील समस्या या विषयावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. मात्र, हे व्यक्त करत असताना त्यांनी मॅक्समहाराष्ट्रच्या पत्रकार अनिता आंब्रे यांच्यासह कार्यक्रमात बसलेल्या सर्व पत्रकारांना मुर्ख असं संबोधत तुम्ही सर्व नालायक आहात असे शब्द वापरले.

Full View

Similar News