स्थिती सामान्य होईपर्यंत कश्मीर केंद्रशासीत - अमित शहा

Update: 2019-08-05 13:46 GMT

कश्मीरमध्ये कायम स्वरूपी केंद्रशासीत परिस्थिती ठेवण्यात आम्हाला रस नाही, जम्मू-कश्मीर मध्ये स्थिती सामान्य होताच जम्मू-कश्मीरला पुन्हा पूर्ण राज्याचा दर्जा देण्यास आम्ही तयार आहोत असं गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं आहे.

41 हजार पेक्षा जास्त लोकांचे प्राण कश्मीरच्या संघर्षात गेले आहेत. या सगळ्यांच्या प्राणांची किंमत देशाने चुकवली आहे. कश्मीर या देशाचा मुकुटमणी आहे आणि राहणार आहे. आमच्यावर विश्वास दाखवा येत्या पाच वर्षांत कश्मीर देशातील सर्वांत जास्त विकसित राज्य झालेलं असेल अशी ग्वाही अमित शहा यांनी दिली. मतांच्या राजकारणापासून वर येऊन कश्मीरच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. 370 हटवल्यामुळे कश्मीरमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं ही अमित शहा यांनी सांगीतलं.

अमीत शहा यांनी आजही आपल्या भाषणात इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला केला. जवाहरलाल नेहरू यांनी कश्मीर प्रश्न हाताळल्यामुळे 370 चा मुद्दा आला, तसंच इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली त्यावेळी जम्मू-कश्मीर विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षे झाला, तो परत पाच वर्षे झालाच नाही याची आठवण ही अमित शहा यांनी करून दिली.

Similar News