Jammu & Kashmir live Update : कॅबिनेटची बैठक संपली...  

Update: 2019-08-05 05:13 GMT

जम्मू-काश्मीर बरोबरच आता दिल्लीत देखील वेगानं घडामोडी घडत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काय निर्णय झाला? या संदर्भात अमित शाह संसदेचं अधिवेशन सुरु असल्यानं राज्यसभेत 11 वाजता राज्यसभेत, तर 12 वाजता लोकसभेत माहिती सांगणार आहेत.

जम्मू- काश्मीरमध्ये रविवारी मध्यरात्रीपासूनच जमावबंदीसाठी असलेलं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. तसेच माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये फोन, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून शाळा, महाविद्यालयं आणि संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

Similar News