जम्मू कश्मीर मध्ये राहणाऱ्या बाहेरच्या लोकांना मतदानाचा अधिकार, राजकारण तापलं...

जम्मू कश्मीर मध्ये मतदानाच्या हक्कावरून नक्की काय वाद सुरू आहे? जम्मू आणि कश्मीरमधील राजकीय नेत्यांचं नक्की मत काय आहे?

Update: 2022-08-18 10:25 GMT

जम्मू-काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी इतर राज्यांतील लोकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर स्थानिक लोक नसलेल्या लोकांवरील हल्ले वाढवण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे. लष्कर-ए-तैयबा-समर्थित दहशतवादी गट काश्मीर फाईटने इतर राज्यांतील लोकांना मतदानाचा अधिकार दिल्यास दहशतवादी कारवाईची करण्याची धमकी दिली आहे.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) हिरदेश कुमार यांनी जे लोक बाहेरच्या राज्यामधून आलेले आहेत. जे जम्मू आणि काश्मीरमधील मूळ रहिवासी नाही. मात्र, कामासाठी शिक्षणासाठी, जम्मू आणि काश्मीरमध्ये राहतात ते लोक त्यांचं नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. असा निर्णय जाहीर केला होता.

दुसऱ्या राज्यातील लोकांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी डोमिसाइलची आवश्यकता नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेले इतर राज्यांतील सशस्त्र दलाचे कर्मचारीही मतदार यादीत आपली नावे समाविष्ट करू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

काश्मीरमध्ये अलीकडेच अनेक दहशतवादी घटना घडल्या आहेत. बुधवारी दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची हत्या केली होती. यापूर्वी बिहारमधील एका मुस्लिम मजुराची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. गेल्या आठवड्यात सुरक्षा दलांच्या तळांवर दोन हल्ले झाले आहेत. ज्यामध्ये तीन जवान शहीद झाले तर दोन दहशतवादी मारले गेले.

काश्मीरमध्ये सध्या निवडणुकांचा मुद्दा गाजत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. बाहेरच्या लोकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाचा काश्मीरमध्ये तीव्र विरोध होत आहे. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे.

5 ऑगस्ट 2019 ला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आले होते. त्याचबरोबर जम्मू कश्मीर राज्याचे विभाजन करण्यात आले होते. जून 2018 पासून राज्यात कोणतेही सरकार अस्तित्वात नाही.

काय आहे नेत्यांच्या प्रतिक्रिया..

माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीर निवडणुकीत बाहेरच्या लोकांना मतदान करण्याची परवानगी देण्याचा निर्णय निवडणूक निकालांवर प्रभाव टाकण्यासाठी घेण्यात आला असल्याचा आरोप केंद्र सरकावर केला आहे. स्थानिक लोकांची शक्ती कमी करणे आणि जम्मू-काश्मीरवर जबरदस्तीने राज्य करणे हा त्यांचा खरा हेतू आहे.




तसंच या संदर्भात माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या मतदारांबद्दल भाजप इतका असुरक्षित का आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. भाजप निवडणूका जिंकण्यासाठी बाहेरून मतदार आयात करत आहे. असा आरोप अब्दुला यांनी केला आहे. या निर्णयांचा भाजपला फायदा होणार नाही, असेही अब्दुला यांनी म्हटलं आहे.



 



Tags:    

Similar News