जळगाव: पोलीस भरती परीक्षेत 'हायटेक कॉपी', खास कॉपीसाठी तयार केला मोबाईल

Update: 2021-10-10 10:35 GMT

जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती परीक्षेसाठी पेन, पेन्सील, ओळखपत्र एवढंच परिक्षार्थीला परीक्षा हॉलमध्ये बाळगण्याची परवानगी असतांना कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या परीक्षा केंद्रावर हाय टेक कॉपीचा प्रकार समोर आला आहे. एक परीक्षार्थी विद्यार्थ्यांने चक्क मोबाईल आणून व्हाट्सएपच्या च्या माध्यमातुन मित्राशी चॅट द्वारे पेपर सोडवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी परीक्षार्थी आणि त्याच्या मित्रावर धरणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रतापसिंह गुलचंद बालोद याने एटीएमच्या आकाराचे एक डिव्हाइस सोबत आणले होते. त्यात मेमरी कार्ड होते. ते ब्लूटूथने कनेक्ट करून स्पीकरमधून आवाज दिला होता. लहान आकाराचा स्पीकर त्याने कानात लपवला होता. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीचे आवाजत्याला ऐकू येईल अशी व्यवस्था केली होती. प्रतापसिंग हा परीक्षा केंद्रावर आला. तेव्हा त्याने बनियनमध्ये डिव्हाइस लपवले होते. पण परीक्षा केंद्राच्या आत जाण्याआधीच त्याचा हा प्रकार उघडकीस आला.

जळगाव जिल्ह्यात पोलीसदलातर्फे आस्थापनाच्या 128 जागांसाठी भरती प्रक्रियासाठी आज लेखी परीक्षा घेण्यात आली. जळगाव आणि भुसावळ शहरातील 58 केंद्रांवर 21 हजार 690 उमेदवारांची 100 गुणांची परीक्षा घेण्यात आली.

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ केंद्रावर योगेश आव्हाड नावाच्या परीक्षार्थीने पोलिसांना गुंगारा देत परीक्षा हॉल मध्ये मोबाईल आणून बाहेर असलेल्या मित्राला प्रश्न पत्रिका पाठवून परीक्षा देत असल्याचा प्रकार पोलिसांनाच लक्षात आल्यावर ह्या परिक्षार्थीला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याचा मोबाईल जप्त करून योगेश आव्हाड आणि त्याला मदत करणाऱ्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News