चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करण्यासाठी 10 ते 12 वर्षे लागतील : शरद पवार

Update: 2020-02-23 08:12 GMT

आज मुंबईत ‘युवा संसद कार्यक्रम’ पार पडत आहे. या कार्यक्रमात शरद पवार यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी दया भट या विद्यार्थ्यीनीने शरद पवारांना एक मजेदार प्रश्न विचारला... मध्यंतरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी जर मला पीएचडी करण्यास संधी मिळाली तर आपण शरद पवारांवर पीएचडी करु असं विधान केलं होतं. यावर या विद्यार्थ्यीनीने शरद पवारांना प्रश्न विचारला असता.

शरद पवार यांनी देखील तितकच मजेदार उत्तर दिलं. पीएचडी करण्यासाठी किती वर्ष लागतात? पोस्ट ग्रेजुएशन नंतर साधारण तीन वर्ष लागतात. मात्र, चंद्रकांत पाटील यांना माझ्यावर पीएचडी करण्यासाठी त्यांनी 10 ते 12 वर्षे लागतील. असं म्हणत मजेदार उत्तर दिलं. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Similar News