फक्त चार दिवसात 50 कोटी आंबेडकरी साहित्य खरेदी झाल्याचा अंदाज

Update: 2019-12-15 15:35 GMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त्त त्यांना अभिवादन करण्यासाठी कोट्यावधींचा जनसागर चैत्यभूमीवर जमला होता. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी साहीत्यांची खरेदी केली गेली. चैत्यभूमीवर फक्त चार दिवसात ५० कोटी रुपयांचे आंबेडकरी साहीत्य खरेदी झाल्याचा अंदाज आहे.

या वर्षी शिवाजी पार्क येथे ३०० पेक्षा अधिक स्टॉलवर साहित्य विक्री करण्यात आले. तर पदपथांवर साधारणता ७०० पेक्षा अधिक पुस्तक विक्रीची दुकाने थाटण्यात आली होती. १०० रुपायांच्या पुस्तिकांपासून साडेतीन हजार रुपायांचे खंड यावेळी विक्रीस उपलब्ध होते. भारतीय सविधान, भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म या पुस्तकांना सर्वाधिक मागणी होती.

त्याचबरोबर पुस्तकांशिवाय भगवान बुध्द आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आणि पुतळा खरेदी करण्याकडेही भीम अनुयायांचा कल अधिक होता. त्यामुळे चार दिवस प्रत्येक स्टॉलवर झुंबड उडाली होती.

Full View

Similar News