ISRO YUVIKA 2024: ISRO मध्ये यंग सायंटिस्ट प्रोग्राम जाहीर, तरुण विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी मिळणार शिकायला; 20 फेब्रुवारीपासून अर्ज करा

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने इयत्ता 9 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षासाठी YUVIKA 2024 प्रोग्रामसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेवर आधारित आहे.

Update: 2024-02-18 06:40 GMT

ISRO YUVIKA कार्यक्रम 2024: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने यंग सायंटिस्ट प्रोग्राम (YUVIKA) 2024 जाहीर केला आहे. मुलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाची परीक्षा 13 ते 24 या कालावधीत होणार आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अंतराळ तंत्रज्ञान, विज्ञान आणि अनुप्रयोगांची प्राथमिक माहिती दिली जाईल. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची मूलभूत समज विकसित करण्याच्या उद्देशाने हा दोन आठवड्यांचा निवासी कार्यक्रम आहे.

इस्रोच्या या कार्यक्रमात नोंदणी 20 फेब्रुवारी ते 20 मार्च 2024 या दरम्यान राहणार आहे. पात्र विद्यार्थ्यांची निवड इयत्ता 8वीच्या गुणांच्या 50 टक्के वेटेज आणि ऑनलाइन क्विझच्या 10 टक्के वेटेजच्या आधारे केली जाईल. याशिवाय शालेय किंवा जिल्हा किंवा राज्यस्तरावर होणाऱ्या विज्ञान मेळाव्यात रँकनुसार वेटेज 10 टक्क्यांपर्यंत असेल. क्रीडा स्पर्धा जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ टक्के आणि एनसीसीमध्ये (NCC) सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ टक्के वेटेज मिळेल. यासोबतच ग्रामीण भागातील किंवा पंचायत शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 टक्के वेटेज मिळणार आहे.

देशातील ग्रामीण भागाला प्राधान्य देऊन तरुण विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान, अवकाश तंत्रज्ञान आणि अवकाश अभ्यासक्रमाशी निगडित तंत्राविषयी मूलभूत ज्ञान मिळावे ही यंग सायंटिस्ट प्रोग्राम - युविका कार्यक्रमाची संकल्पना आहे. अशा प्रकारे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीन प्रगत कल समजण्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात दोन आठवड्यांचे वर्ग प्रशिक्षण, प्रयोगांच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, कॅनसॅटवर तंत्रज्ञानाविषयी माहिती, रोबोटिक किट, इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत मॉडेल रॉकेट्री संवाद आणि क्षेत्रिय भेटी यांचा समावेश आहे.

Tags:    

Similar News