इराणची राजधानी तेहरान इधून उड्डाण घेतलेल्या युक्रेनच्या प्रवासी विमानाला चुकून पाडल्याची कबुली इराणच्या लष्करानं दिलीय. अमेरिकेनं इराणचे कमांडर कासीम सुलेमानी यांना बगदादमध्ये ठार केल्यानंतर इराणणं अमेरिकेच्या इराकमधील तळांवर हल्ला केला होता. त्याच दिवशी युक्रेनच्या विमानाला अपघात झाल्याचं वृत्त आलं होतं.
या विमानात १७६ प्रवासी होते, या सर्वांचा यात मृत्यू झाला होता. सुरूवातीला तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण अखेर आज इराणनं या विमानावर चुकून क्षेपणास्त्र डागलं गेलं अशी कबुली दिलीये. इराणची राजधानी तेहरान इथून या विमानानं उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच ते विमान कोसळलं होतं.