डिजिटल व्यवहारासाठी 'इन्फीबीम' आता 'जिओ'सोबत

Update: 2020-10-05 13:40 GMT

मुंबईः जगातील मोठ्या फ्लिफकार्ट, स्नॅपडील यांसारख्या ई-व्यापार संकेतस्थळांची स्पर्धक असलेल्या ऑनलाइन शॉपिंगमधील इन्फीबीम इन्कॉर्पोरेशन आज जियो प्लॅटफॉर्म आणि संलग्न कंपन्यासोबत करारबध्द झाली आहे.

२००७ साली सुरू झालेल्या या कंपनीकडून इन्फीबीम डॉट कॉम, बिल्ड अ बझार, इन्सेप्ट आणि पिक्सस्क्वेअर अशी ई-व्यापार दालने सुरू आहेत.

कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आणि लोकांनी जास्तीत जास्त डिजिटल माध्यमांचा वापर करून आपले व्यवहार पूर्ण केले. पण डिजिटल व्यवहारांना भविष्यामध्ये देखील मोठी मागणी असेल हे लक्षात घेऊन आता डिजिटल प्लॅटफॉर्म कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ लागली आहे. इन्फीबीम इन्कॉर्पोरेशन आज जियो प्लॅटफॉर्ममधील करार देखील याच गुंतवणुकीचा भाग आहे. तंत्रज्ञान क्षेत्रा व्यतिरिक्त इन्फीबीमची आदरातिथ्य , उत्पादन आणि कृषी तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये देखील गुंतवणूक आहे. इन्फिबीम अव्हेन्यू ही भारतातील इंटरनेट आणि ई कॉमर्स क्षेत्रातील अग्रेसर कंपनी आहे. काही महीन्यापूर्वीच कंपनीने कार्डपे टेक्नॉलॉजीचा 100% ताबा घेतला होता. डिजिटल पेमेंट कंपनीमधील इन्फिबीमची गुंतवणूक 4 कोटी 71 लाख 73 हजार 974 इक्विटी शेअर्स एवढी असून कोरोनाच्या संकटामुळे तंत्रज्ञान हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहेय सोशल डिस्टंसिंगमुळे भविष्यात ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट यांना प्रचंड मागणी असेल, असा इन्फिबीम अव्हेन्यूचा दावा आहे.

[pdf-embedder url="http://www.maxmaharashtra.com/wp-content/uploads/2020/10/infibeam-jio.pdf"]

Similar News