“सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा, विषम तिथीला केल्यास मुलगी” - निवृत्ती महाराज इंदोरीकर 

Update: 2020-02-11 13:40 GMT

”सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते” असं वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी केल्याचा दावा केला जात आहे.. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांना PCPNDT च्या सल्लागार समितीने त्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. इंदोरीकर यांनी ओझोर येथे किर्तन करताना हे वक्तव्य केलं. असं एका पत्रकाराने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

PCPNDT च्या सल्लागार समितीच्या मते हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे PCPNDT कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन आहे. असे आरोप PCNDT च्या सल्लागार समितीने केले आहेत.

सल्लागार समितीने नोटीस बजावल्यानंतर यात जर काही पुरावे आढळले तर तर इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असं PCPNDT च्या सदस्यांनी सांगितलं आहे. या संदर्भात लोकसत्ताने उत्तर दिलं आहे.

Similar News