देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५ हजारांच्या वर

Update: 2020-06-02 07:19 GMT

गेल्या २४ तासात देशात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ८ हजार ११७ ने वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ९८ हजार ७०६ झाली आहे. पण यापैकी ९५ हजार ५२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या २४ तासात २०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आता देशातील कोरोनाबाधीत एक्टिव्ह रुग्णांची संख्या ९७ हजार ५८१ झाली आहे. तर मृतांची संख्या ५ हजार ५९८ झाली आहे.

Similar News