#कोरोनाचा कहर देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1 लाखांच्यावर

Update: 2020-05-19 15:40 GMT

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या दुसऱ्याच दिवशी देशभरातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1 लाखांच्यावर गेली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 4 हजार 970 नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 139 झाली आहे. तर देशभरात गेल्या 24 तासात 134 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या 3 हजार 163 झाली आहे.

तर कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही 39 हजार 174 झाली आहे. तसंच एकूण रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 30 टक्क्यांच्यावर गेले आहे. दरम्यान जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत भारत आता जगात अकराव्या क्रमांकावर पोहोचला आहे. ज्या चीनमधून कोरोनाचा प्रसार झाला तिथल्या रुग्णांची संख्या 84 हजार 63 आहे.

Similar News