लॉकडाऊन-3 आज संपणार, लॉकडाऊन- 4 चे काय?

Update: 2020-05-17 02:30 GMT

कोरोनाच्या संकटामुळे 24 मार्च रोजी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आज लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लॉकडाऊनचा चौथा टप्पा 18 मे पासून सुरू होईल असे नुकतेच जाहीर केले आहे. पण हे लॉकडाऊन किती दिवसांचे असेल, या लॉकडाऊनमध्ये नवीन नियम कोणते असणार आहेत याची सरकारने अजूनही कोणतीही घोषणा केलेली नाही. पण लॉकडाऊन 4 मध्ये नियम मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात येतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे गेल्या जवळपास 2 महिन्यांपासून ठप्प असलेल्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात विमानसेवा काही प्रमाणात सुरू केली जाण्याची शक्यता आहे. तर सार्वजनिक वाहतूकही काही प्रमाणात सुरू केली जाऊ शकते अशी चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना 15 मेपर्यंत ल़ॉकडाऊन 4 बाबत आपले प्रस्ताव केंद्राला पाठवण्याच्या सचूना केल्या होत्या. त्यानुसार राज्यांनी आपापले प्रस्ताव पाठवले आहेत. यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठवलेल्या प्रस्तावात दिल्लीत सर्व कार्यालये 50 टक्के मनुष्यबळासह सुरू करावे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मेट्रो सेवा सुरू करण्यात यावी, कॉम्प्लेक्समधील दुकानेही उघडण्याची परवानगी देण्यात यावी असा प्रस्ताव पाठवला आहे. आता आज सरकारतर्फे नवीन नियम आणि मार्गदर्शक तत्वांची काय घोषणा केली जाते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Similar News