कराची विद्यापीठात महिलेचा आत्मघातकी हल्ला, तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू

Update: 2022-04-26 15:26 GMT

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील कराची विद्यापीठात महिलेने केलेल्या आत्मघातकी हल्ला केला आहे. तर या हल्ल्यात तीन चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (sucide bomb attack in Pakistan)

पाकिस्तानातील कराची विद्यापीठात एका बुरखाधारी महिलेने आत्मघाती हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर हा हल्ला कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशियस इमारतीजवळ करण्यात आला आहे. याबाबत सिंध पोलिस प्रमुखांनी दुजोरा दिला आहे. (Woman made sucide bomb Attack in Karachi university)

प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एक बुरखाधारी महिला व्हॅनची वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे. मात्र व्हॅन जवळ आली असता या महिलेने स्वतःला आत्मघाती बाँबने उडवून दिले. त्यामुळे या स्फोटात तीन चिनी नागरिकांसह व्हॅनच्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाला आहे. तर मृत्यूमुखी पडलेले चिनी नागरिक शिक्षक व्हॅनमधून कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशियस इमारतीकडे जात होते. त्यावेळी मोठा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Sucide Bomb in Pakistan)

नेमकं काय घडलं?

कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशियस इमारतीच्या बाहेर एक बुरखाधारी महिला चिनी नागरिकांच्या बसची वाट पाहताना दिसत आहे. मात्र बस जवळ आली असता स्वतःला आत्मघाती बाँबने उडवून दिले. त्यामुळे बसला आग लागली. तर त्यात तीन चिनी नागरिकांसह एक जणाचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबरच संरक्षणासाठी असलेल्या पाकिस्तानचे चार जवानही या स्फोटात जखमी झाले आहेत, अशी माहिती सिंधचे आयजी गुलाब नबी यांनी दिली.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी (BLA)

पाकिस्तानातील कराची विद्यापीठीच्या परिसरात महिलेने केलेल्या आत्मघाती स्फोटाची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली आहे. तर बीएलएची मजीद ब्रिगेडची महिला फिदायन हल्लेखोर शरी बलोच उर्फ ब्रमश हीने स्वतःला आत्मघाती बाँबने उडवून घेतले.

Tags:    

Similar News