Salman Rushdie attacked : जागतिक कीर्तीचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला, संशयाची सुई कुणाकडे?

जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये रश्दी यांच्यावर चाकूने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या हल्ल्यासाठी जबाबदार कोण? अशी चर्चा रंगली आहे.

Update: 2022-08-13 03:28 GMT

सलमान रश्दी हे बुकर पुरस्कार विजेते आंतरराष्ट्र्यी ख्यातीचे लेखक आहेत. तर त्यांनी लिहीलेले द सॅटेनिक व्हर्सेज हे पुस्तक वादग्रस्त ठरले होते. त्यावरून सलमान रश्दी यांना अनेक धमक्या येत होत्या. त्यातच त्यांनी युक्रेनच्या लेखकांना मदत पाठवण्यात यावी, असे आवाहन अमेरिकी संघटनांना केले होते. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये जाहीर कार्यक्रमात 12 ऑगस्ट रोजी सलमान रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यामध्ये सलमान रश्दी गंभीर जखमी झाले असून त्यांना हवाई रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्लेखोराची ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सलमान रश्दी कोण आहेत?

सलमान रश्दी यांचा जन्म 19 जून 1947 रोजी मुंबई येथे झाला. तर त्यांनी आतापर्यंत 14 कादंबऱ्या लिहील्या आहेत. त्यात लहान मुलांसाठी लिहीलेल्या दोन कादंबऱ्यांचाही समावेश आहे.

सलमान रश्दी यांनी आतापर्यंत 14 कादंबऱ्या लिहील्या. त्यामध्ये ग्रिमस, मिडनाईट चिल्ड्रन, शेम, द सॅटेनिक व्हर्सेस, हरून अँड द सी ऑफ स्टोरी, द मूर लास्ट साई, द ग्रआऊंड बेनेथ हर फीट, फरी, शालीमार द क्ल्वॉन, द इनचॅन्ट्रीज ऑफ फ्लोरेन्स, लुका अँड द फायर ऑफ लाईफ, टू येअरर्स, एट मन्थ अँड ट्वेंटी एट नाईट अँड गोल्डन हाऊस आणि क्विचॉट यांचा समावेश आहे.

सलमान रश्दी यांच्या विविध पुस्तकांची सात वेळा बुकर पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्यामध्ये त्यांनी लिहीलेल्या मिडनाईट चिल्ड्रन या 1981 साली प्रसिध्द झालेल्या कादंबरीला बुकर पुरस्कार मिळाला. याबरोबरच या पुस्तकाला 50 वर्षातील बेस्ट पुस्तक असाही पुरस्कार मिळाला.

सलमान रश्दी आणि वाद

सलमान रश्दी यांची 1988 साली प्रसिध्द झालेली कादंबरी द सॅटेनिक व्हर्सेस यामध्ये मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचे म्हटले गेले. त्यामुळे राजीव गांधी यांच्या सरकारने देशात या कादंबरीवर बंदी घातली होती, तर या कादंबरीत ईशनिंदा केल्याचे सांगत ईराणने थेट सलमान रश्दी यांचे शिर कलम करणाराला ईनाम जाहीर केला होता. त्यामुळे या हल्ल्याची सुई इराणकडेच वळत असल्याचे अनेकांचे मत आहे.

रशिया युक्रेन युध्द सुरू असल्याने युक्रेनमधील लेखकांना अमेरीकेच्या संघटनांनी मदत करावी, असंही आवाहन सलमान रश्दी यांनी केले होते.

तब्बल ९ वर्षे अज्ञातवासात होते रश्दी

सलमान रश्दी यांची 1988 साली प्रकाशित झालेली द सॅटेनिक व्हर्सेस ही कादंबरी जगभर गाजली. त्यामध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त लिखाण करण्यात आल्याने ईराणने रश्दी यांचे शिर कलम करण्यासाठी ईनाम ठेवला. ईराणचे तात्कालिन सुप्रीमो आयातुल्ला खोमेनी यांनी सलमान रश्दी यांच्यासह हे पुस्तक छापणाऱ्या प्रकाशकांनाही जीवे मारण्याचा फतवा काढला होता. त्यामुळे या प्रकरणाचे तीव्र पडसाद हे आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले.

द सॅटेनिक व्हर्सेस या कादंबरीचे विविध भाषेत भाषांतर करणाऱ्या 59 जणांचा वेगवेगळ्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. तर कादंबरीचे लेखक सलमान रश्दी यांना तब्बल 9 वर्षे अज्ञातवासात रहावं लागलं होतं.

द सॅटेनिक व्हर्सेस कादंबरीत नेमकं काय?

द सॅटेनिक व्हर्सेस या कादंबरीमध्ये सलमान रश्दी यांनी कुराणमधील आयाताच्या मोहम्मद पैगंबर यांच्या तोडून सैतानाने वदवून घेतल्याचे म्हटले आहे. त्यावरून जगभरात तीव्र पडसाद उमटले. या आयताविषयी मुस्लिम अभ्यासकांनीही वेळोवेळी चर्चा केली आहे. तर या आयताचा उल्लेख इंग्रजीत सॅटेनिक व्हर्सेस असा होत असल्याने सलमान रश्दी यांनी या कादंबरीचे नाव हे द सॅटेनिक व्हर्सेस असं ठेवलं.

मात्र अनेक अभ्यासकांना हे पुस्तक जादूई पध्दतीने वास्तववादी वाटते. तर काही अभ्यासकांना हे पुस्तक वास्तवापेक्षा अति प्रमाणात वास्तव असल्याचे वाटते. याबरोबरच अनेक साहित्यिकांनी सलमान रश्दी यांच्या साहित्यिक मुल्यांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

सलमान रश्दी यांच्या द सॅटेनिक व्हर्सेस कादंबरीमध्ये नेमकं काय म्हटलं आहे. हे फक्त अभ्यासकांकडून आपल्याला समजू शकतं. कारण सध्या देशात या कादंबरीवर बंदी असल्याने ती वाचायला मिळणे शक्य नसल्याचे म्हटले जात आहे.

सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्याची सुई कुणाकडे?

सलमान रश्दी यांनी लिहीलेल्या द सॅटेनिक व्हर्सेस कादंबरीमुळे जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे मुस्लिम राष्ट्रांमधून त्यांना धमक्या येत होत्या. मात्र ईराणचे आयतुल्ला खोमेणी यांनी थेट सलमान रश्दी यांचं शिर कापून आणण्यासाठी ईनाम ठेवला. त्यामुळे या हल्ल्यामागे ईराणचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्याच्या संशयाची सुई इराणकडे वळत आहे.

हल्ला कुणी केला?

सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील फेअरव्ह्यू न्यजर्सी येथील 24 वर्षीय हादी मतार या युवकाने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर या हल्ल्यासंदर्भात अमेरीकेची गुप्तचर संस्थाही तपास करणार आहे.

Tags:    

Similar News