क्वॉरंटाईन सेंटर की तुरुंगवास? सेनेच्या उपविभाग प्रमुखाचा सवाल?

Update: 2020-06-07 01:57 GMT

कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवणापासून ते इतर सोयी सुविधा नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. पण आता राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईत या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

अंधेरी पुर्व, विलेपार्ले पुर्व, इथल्या काही नागरीकांना खार पश्चिममध्ये क्वारंटाईन केले गेले. पण रात्री अकरा वाजले तरी जेवण आणि पाणी नाही, कसलीच सुविधा नाही अशी तक्रार केंद्रातील एका तरुणाने केल्याचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावरे यांनी सांगितले आहे. त्या तरुणाने एका व्हिडिओमार्फत संपर्क केला आणि केंद्रातल सर्व अवस्था सांगितली आणि सरकार कडे आमची ही व्यथा पाठवा अशी विनंती केल्याचे जनावरे यांनी सांगितले.

यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे जनावळे यांनी जेव्हा के पूर्व पालिका अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली तेव्हा, खार पश्चिममधील केंद्रात अलागिकरणत २७५ नागरिकांना ठेवण्यात आले आहे, पण त्यांच्या जेवण आणि पाणी याची जवाबदारी पालिका वॉर्ड के पूर्वची आहे, असे सांगण्यात आले. ते २७५ के पूर्व विभागातील रहिवाशी आहेत त्यांची जवाबदारी स्थानिक पालिका वॉर्डने घेतली पाहिजे असंही त्यांना सांगण्यात आले. दरम्यान आज पासून खार येथील केंद्रात ठेवलेल्या नागरिकांना के /पूर्व विभागाकडून जेवण आणि पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Similar News