२४ तासांत ३९०० नवे कोरोना रुग्ण; मुंबईची संख्या २५१० वर, आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली

महाराष्ट्रात काल नव्याने ३ हजार ९०० नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यात एकट्या मुंबईमध्ये २ हजार ५१० रूग्ण आढळलेत. २८ डिसेंबरला महाराष्ट्रात २ हजार १७२, तर मुंबईत १ हजार ३३३ रूग्ण आढळले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांची काळजी वाढली आहे.

Update: 2021-12-30 01:01 GMT

मुंबई // महाराष्ट्रात काल नव्याने ३ हजार ९०० नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यात एकट्या मुंबईमध्ये २ हजार ५१० रूग्ण आढळलेत. २८ डिसेंबरला महाराष्ट्रात २ हजार १७२, तर मुंबईत १ हजार ३३३ रूग्ण आढळले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांची काळजी वाढली आहे.

त्यामुळे वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. याबाबत स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इशारा दिला आहे. लोकांकडून नियमांचं पालन केलं जात नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे. आपल्याकडे जर सर्वच बाबी सहजपणे घेतल्या तर त्याची किंमत चुकवावी लागेल असं सांगत राजेश टोपे यांनी निर्बंध अजून कडक केले जाऊ शकतात असा इशारा दिला आहे. लसीकरणा बाबतीतही आपण थोडे मागे असून ते योग्य नाही असं सांगत त्यांनी ही टक्केवारी वाढवण्याचे आवाहन केलं आहे. १०० टक्के लसीकरणाचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.

"मागील आठ दिवसात पाहिलं तर २० डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाच ते सहा दरम्यान सक्रिय रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात ११ हजार ४९२ रुग्ण आहेत. २० हजारांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. मुंबईची तुलना केली तर मुंबईत ३०० च्या आसपास केसेस होत्या, सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात डबलिंग होत आहे अशी परिस्थिती आहे," अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Tags:    

Similar News