अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध गेल्या २४ तासांत २० गुन्हे दाखल

Update: 2020-04-09 02:50 GMT

सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा आणि आक्षेपार्ह मजकूर पोस्ट आणि फॉरवर्ड करणाऱ्यांवर महाराष्ट्र सायबर सेल करडी नजर ठेवून आहे. लॉकडाउनपासून आजपर्यंत महाराष्ट्रात सोशल मीडियावर खोट्या बातम्या, अफवा व द्वेषयुक्त मजकूर पोस्ट केल्याबद्दल एकूण १३२ गुन्हे दाखल आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण २० एफआयआर नोंदवल्या गेल्या आहेत.

या २० प्रकरणांपैकी १४ जातीय तेढ निर्माण करणारे असून ६ कोरोनासंबंधीच्या अफवा आहेत. गेल्या ५ दिवसात सोशल मीडियावर द्वेषयुक्त भाषण आणि जातिय तेढ निर्माण करण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. १३२ प्रकरणांमध्ये ३५ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ जणांची ओळख पटली आहे अशी माहिती राज्य सायबर सेलकडून देण्यात आली आहे.

Similar News