भारतात नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक?

Update: 2020-06-15 03:31 GMT

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता दररोज १२ हजारांच्या जवळपास वाढत आहे. पण सरकारने आता लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी कोरोनाचे संकट एवढ्या लवकर जाणार नाही अशी शक्यता व्यक्त होते आहे.

नोव्हेंबरमध्ये देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा उच्चांक असेल असा अंदाज ICMR ने नेमलेल्या अभ्यासगटाने व्यक्त केला आहे. कोरोना रुग्णवाढीचा कालावधी लॉकडाऊनमुळे वाढला आहे. तसंच मृतांची संख्याही कमी झाली आहे. पण रुग्णांची संख्या वाढेल तेव्हा आरोग्य सोयी सुविधा कमी पडण्याची शक्यता या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे.

हे ही वाचा..

सरकारने अंबानींच्या अँटालिया इमारतीचा ताबा घेण्याची मागणी

जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या नरकयातना कायम, आरोग्य व्यवस्था फोल

ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खासगी लॅबचे शुल्क केले कमी

लॉकडाऊनमुळे ३४ ते ७६ दिवसांपर्यंत कोरोनाचा उच्चांक लांबला तसंच संसर्गाचे प्रमाण ६९ ते ९७ टक्के कमी झाले, असाही निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे. दरम्यान भारतात समूह संसर्ग नसल्याचा दावा ICMRने याआधीच केला आहे.

Similar News