Home > News Update > ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खासगी लॅबचे शुल्क केले कमी

ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खासगी लॅबचे शुल्क केले कमी

ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खासगी लॅबचे शुल्क केले कमी
X

राज्यातील कोरोना चाचण्यांसाठी मान्यता प्राप्त असलेल्या प्रयोगशाळांचे कोरोना निदान चाचणी शुल्क निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल समितीला दिला आहे.

राज्यातील प्रयोगशाळांची पूर्णक्षमतेने वापरण्यासाठी व जास्तीतजास्त चाचण्या होण्यासाठी राज्य शासनाने राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्चिती समिती स्थापन केली होती.

त्या समितीने आयसीएमआरनं निश्चित केलेले ४५०० हे शुल्क रद्द करत नवीन दर ठरवण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. या समितीच्या निर्देशानुसार उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं कोरोना चाचणीच्या दरात ५० टक्क्यांनी कपात करत खासगी लॅबला दणका दिला आहे.

यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले की, “खासगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीच्या शुल्कात सरकारनं कपात केली आहे. हे शुल्क पूर्वी ४५०० रुपये इतके होते, ते आता २२०० रुपये घेतले जाईल. कमी कमी दर निश्चित केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल,” असं टोपे यांनी सांगितलं आहे.

“व्हीटीएमच्या माध्यमातून हॉस्पिटलमधून स्वॅब घेतल्यास २२०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २८०० रुपये शुल्क असेल. पूर्वी हॉस्पिटलमधून स्वॅब ४५०० शुल्क आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास ५२०० रुपये इतकं शुल्क रुग्णाला द्यावं लागत होतं,”

Updated : 13 Jun 2020 9:18 AM GMT
Next Story
Share it
Top