Home > News Update > सरकारने अंबानींच्या अँटालिया इमारतीचा ताबा घेण्याची मागणी

सरकारने अंबानींच्या अँटालिया इमारतीचा ताबा घेण्याची मागणी

सरकारने अंबानींच्या अँटालिया इमारतीचा ताबा घेण्याची मागणी
X

जुन्या चाळीतील आणि झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी पुर्नविकासानंतर तयार होत असलेली घरे कोरोना रुग्णासाठी ताब्यात घेण्याची योजना मुंबई महापालिकेने आखली आहे. पण ही योजना रद्द करावी अन्यथा रहिवासी अंबानीच्या बंगल्यात व टॉवरमधिल रिकाम्या फ्लॅटमध्ये घुसतील असा ईशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई सेक्रेटरी कॉ. प्रकाश रेड्डी यांनी दिला आहे.

मुंबई सारख्या कष्टकरांच्या शहरात जुन्या चाळीत व झोपडपट्टयात लाखो लोगस अनेक पिढ्या राहात आहेत. त्यांचा पुनर्विकासही अनेक वर्षे प्रलंबित आहे. आपली घरे रिकामी करून १०,१५,२० वर्षे ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये घरांच्या प्रतिक्षेत आहेत किंवा अनेक ठिकाणी राहात आहेत. अनेक ठिकाणी विकासकाने भाडेही देणे बंद केले आहे. त्यामुळे ते आधीच अडचणीत आहेत. त्यांना त्यांची हक्काची घरे ताबडतोब मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी मागणी रेड्डी यांनी केली आहे.

जे प्रोजेक्ट तयार होण्याच्या अवस्थेत आहेत तिथली घरे मुंबई महानगरपालिका कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेत आहे. हा रहिवाशां अन्याय आहे. त्या सदनिका मूळ रहिवाश्यांना देण्याचे कायदेशीर बंधन सरकारवर, महापालिकेवर, म्हाडावर, एसआरएवर आहे. त्यासाठी काही जण कोर्टात गेले आहेत.

त्यामुळे महापालिकेने हा निर्णय मागे घ्यावा. सरकारने भुखंड बिल्डरांना देणे व मोकाळ्या जागा, बंद पडणाऱ्या कारखान्याच्या जागा टॉवर, मॉल्ससाठी देणे बंद करावे. त्यावर कायम स्वरूपी सरकारी हॉस्पिटल्स बांधावीत, अशी मागणी रेड्डी यांनी केली आहे.

"ह्या शहरात असंख्य टॉवर ऊभे राहिलेले आहेत.त्यातिल अनेक फ्लॅट्स केवळ गुतवणुकीसाठी घेऊन ठेवलेले आहेत ते रिकामे आहेत ते ताब्यात घ्या. मुंबईमध्ये अंबानी कुटुंबाची बावीस मजल्यांची बिल्डिंग आहे.५ जणांचे कुटुंब आहे.एका व्यक्तिला एक मजला दिला तरी १७ मजले ऊरतात. असे अनेक श्रीमंतांचे बंगले आहेत, ते कोरोना रूग्णांसाठी ताब्यात घ्या. महालक्ष्मीचे गोल्फ मैदान आहे. त्यांना आधीच उपनगरात जागा दिली आहे. ते ताब्यात घ्या.सर्व पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घ्या", अशी मागणी रेड्डी यांनी केली आहे.

Updated : 15 Jun 2020 3:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top