देशभरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 6 हजार 556 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता 1 लाख 58 हजार 333वर पोहोचली आहे.
पण दिलासादायक बाब म्हणजे या एकूण रुग्णांपैकी 67 हजार 992 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 हजार 531 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 86 हजार 110 आहे.
देशात सध्या सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे.
हे ही वाचा...
- #कोरोनाशी लढा –जळगाव जिल्ह्यातील रुग्णसंख्या 500 च्यावर
- #कोरोनाला हरवायचंय – रायगड जिल्ह्यात ५७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त
- विदर्भातील शेतकऱ्यांवर संकटांची ‘टोळधाड’
महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 57 हजारांच्या जवळ आहे. तर त्यानंतर सर्वाधिक रुग्णसंख्या तामिळनाडू – 18 हजार 545, दिल्ली-15 हजार 257, गुजरात – 15 हजार 195 अशी आहे.