Top
Home > News Update > #कोरोनाशी लढा –जळगाव जिल्ह्यातील रुग्णसंख्या 500 च्यावर

#कोरोनाशी लढा –जळगाव जिल्ह्यातील रुग्णसंख्या 500 च्यावर

#कोरोनाशी लढा –जळगाव जिल्ह्यातील रुग्णसंख्या 500 च्यावर
X

जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 31 नवीन रुग्ण रूग्णांची एकूण संख्या 523 पर्यंत पोहचली आहे . तर 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 218 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे, जळगाव, भुसावळ शहरात कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या वर गेली आहे. तर भडगाव , पाचोरा तालुक्यांमध्ये संख्या वाढत चालली आहे.

तिकडे धुळे जिल्ह्यातही कोरोना बधितांची संख्या शंभराच्यावर पोहचली आहे.धुळे शहर, तसंच शिरपूर शहरातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आणण्यास प्रसासणाला यश आलं असलं तरी मुंबईहून आलेल्या प्रवाशांमुळे पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ज्या भागात कोरोना नाही त्या भागात लॉकडाऊन उठवण्यात आले आहे.

Updated : 28 May 2020 1:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top