देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 78 हजारांवर

Update: 2020-05-14 07:38 GMT

गेल्या २४ तासात देशात कोरोनाबाधीत रुग्णां संख्या 3 हजार 722 ने वाढून आता 78 हजार 3 वर पोहोचली आहे. तर 24 तासात कोरोनाच्या 134 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोना बळींची संख्या 2 हजार 549 वर पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 26 हजार 235 आहे.

त्यामुळे देशात सध्या कोरोनाचे 49 हजार 219 एक्टिव्ह रुग्ण आहेत. तर देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात सध्या रुग्णांचा आकडा 26 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. तर गुजरात आणि तामिळनाडूमध्ये रुग्ण संख्या 10 हजारांच्या आसपास पोहोचली आहे.

Similar News