अफगाणिस्तान: तालिबान सरकारच्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अडचणी वाढवल्या...

Update: 2021-09-18 06:31 GMT

Photo courtesy : social media

अफगाणिस्तानवर तालिबान ने विजय मिळवल्यानंतर या ठिकाणी आता तालिबान सरकारची स्थापना झाली आहे. मात्र, अद्यापपर्यंत जगातील अनेक राष्ट्रांनी या सरकारला मान्यता दिलेली नाही. त्यामुळं अफगाणिस्तान मधील तालिबान सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. इकडे अमेरिकेने अफगाणिस्तानचा अमेरिकन बॅंकेत असलेला पैसा थांबवला आहे तर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) अफगाणिस्तानशी कोणतेही व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

जोपर्यंत जागतिक समुदाय अफगाणिस्तानला मान्यता देत नाही. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अफगाणिस्तान शी कोणताही व्यवहारा करणार नसल्याचं IMF ने जाहीर केलं आहे.  या संदर्भात आंतरराष्ट्रीय प्रवक्ते गेरी राइस यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले

आम्ही अफगाणिस्तानशी असलेले संबंध व व्यवहार सध्या पुर्णपणे बंद करत आहोत. अफगाणिस्तान सरकारला जागतिक समुदायाने अद्यापपर्यंत मान्यता दिलेली नाही. जोपर्यंत हे संबंध पुन्हा प्रस्थापित करता येत नाही. तोपर्यंत IMF कडून केली जाणारी मदत थांबवण्यात येत असल्याचं गेरी यांनी म्हटलं आहे. 

Tags:    

Similar News