देशात दरदिवसाला कोरोनाच्या 4 लाख चाचण्यांचे लक्ष्य

Update: 2020-06-27 02:33 GMT

ICMRने आता देशात लवकरात लवकर दररोज 4 लाख चाचण्या करता येतील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोनाबाधीत रुग्ण शोधणे, त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध आणि बाधितांवर उपचार यासाठी ICMRतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. पण आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर रुग्णसंख्या वाढत आहे.

सध्या दिवसाला 2 लाख 15 जणांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. पण लवकरच ही संख्या 4 लाखांच्या जवळ नेण्याचा ICMRचा प्रयत्न आहे. सध्या देशात 1000 लॅबमध्ये कोरोनाच्या चाचण्या होत आहेत. शुक्रवारी देशात कोरोनाचे 17 हजार 296 रुग्ण आढळले होते. त्यामुळे एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 90 हजारांच्या पुढे गेली आहे.

हे ही वाचा..

#कोरोनाशी_लढा – गणेशमूर्तींच्या उंचीवर यंदा मर्यादा

अनुसूचित जातीमधील कुटुंबातील 8 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघं गंभीर

तर 407 रुग्णांचा 24 तासात मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या 15 हजार 1 एवढी झाली आहे. पण एकूण कोरोनाबाधीतांपैकी 2 लाख 85 हजार 637 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उर्वरित 1 लाख 89 हजार 463 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Similar News