'स्व. मुंडे साहेबांसोबत मी सावलीसारखा राहिलो; त्यांची स्वप्नं मी पूर्ण करणार!'

Update: 2019-10-07 09:54 GMT

विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे परळीमधून पंकजा मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी पुण्यात राहणाऱ्या परळीकरांशी संवाद साधला. परळीत राहणाऱ्या लोकांच्या मनात मला विजयी करण्यासाठी जितका उत्साह दिसतोय तितकाच उत्साह पुण्यात राहणाऱ्या परळीकरांमध्ये दिसतोय. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असं यावेळी मुंडे म्हणाले.

ताईसाहेब मुंडे साहेबांचे नाव लावतात. मात्र ताईसाहेबांना मुंडे साहेबांचे स्वप्न काय आहे तेच माहिती नाही.

मी मुंडे साहेबांच्या पोटी जन्माला आलो नाही पण मी साहेबांसोबत सावली सारखा वावरलो. त्यांची लोकांसाठीची स्वप्ने मला माहिती आणि ते स्वप्न मी पूर्ण करणार असा निर्धार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

ही निवडणूक परळीच्या प्रत्येक माणसासाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे. त्यामुळे आता आपल्याला पेटून उठायचे आहे. अमित शाह प्रचारासाठी येत आहेत. या प्रचाराअंती नरेंद्र मोदी जरी आले तरी आपल्याला आपल्या परळीसाठी लढायचे आहे.

हा संघर्ष माझ्या मातीतील लोकांसाठी संघर्ष करणार असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं.

स्व. अण्णांचे, स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे निधन झाले. तो काळ माझ्यासाठी अत्यंत अडचणीचा होता. मी पूरता खचलो होतो. राजकारण सोडून द्यावेसे वाटले. मात्र माझ्या मातीतल्या माणसासाठी मला उठून उभे रहावे लागले. अशात

आदरणीय शरद पवार आणि अजितदादांनी आधार दिला.

माझ्या मातीतल्या माणसाला सन्मान मिळावा यासाठी मी झटतोय असं धनंजय मुंडे म्हणाले.

Similar News