"मी दररोजच्या ब्रेकफास्ट मध्ये राजकीय नेते खातो"

Update: 2019-11-11 03:57 GMT

"मी दररोजच्या ब्रेकफास्ट मध्ये राजकीय नेते खातो" असे म्हणायचे धारिष्ट्य दाखविणारा सच्चा माणूस गेला.

निवडणूक प्रक्रियेची मनापासून साफसफाई करणारा, सगळ्या भारताच्या नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणारा एकमेव मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांचे निधन. त्यांना अभिवादन ! सरकारची बाजू उचलून धरणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी लांबचलांब होत असतांना अत्यंत प्रामाणिक व संविधानशीर वागणारा 'माणूस' म्हणून शेषन यांचे नाव अमर राहील. माजी निवडणुक आयुक्त श्री.टी.एन.शेषन यांना भावपुर्ण श्रद्धांजली! !!

निवडणुक आयोग, कॅग, सीव्हीसी, आरबीआय, सीबीआय, न्यायालये आदी स्वायत्त संस्था आहेत पण त्या संस्थांच्या स्वायतत्तेवरच छुपा हमला करून अप्रत्यक्ष आणीबाणी आणणारे किती चोर, कमजोर, दरडेखोर आहेत हे टी. एन. शेषन सारखे निस्पृह अधिकारीच दाखवू शकले असते.

असा एकच अधिकारी जर संपूर्ण निवडणूक व्यवस्था बदलण्याची व मतदारकेंद्रित निवडणूक आणण्याची हिम्मत दाखवू शकला तर लक्षात घ्या जेव्हा असा आणखी एक अधिकारी जन्माला येईल व आहे तेच कायदे वापरण्याची हिम्मत दाखवेल तेव्हा ही लोकशाही पुन्हा एकदा झळाळून उठेल.

आजच्या युगात अश्या काही अधिकाऱ्यांनी जन्म घेतला आहे. काही अधिकारी कार्यरत आहेत, काहींचे ट्रेनिंग झाले आहे आणि काही जण सध्या मसुरीला ट्रेनिंग घेत आहेत. हे अधिकारी जेव्हा त्यांच्या सक्षमतेसह कार्यरत होतील तेव्हा मोठी उलथापालथ होणार. लोकशाहीविरोधी राजकीय नेत्यांना लपायला जागा राहणार नाही.

टी एन शेषन यांना विनम्र अभिवादन !!

Similar News