CAB Protest: दिल्ली पेटली!

Update: 2019-12-16 07:27 GMT

वादग्रस्त नागरिकत्व संशोधन कायद्याच्या (Citizen Amendment Act) विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात (Jamiya Student Protest) निदर्शनं करण्यात आली. या निदर्शनावेळी विद्यार्थी, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी महाविद्यालयाच्या आवारात अश्रू गॅस सोडल्यांनंतर विद्यार्थ्यांना लायब्ररी आणि मशिदीच्या बाहेर खेचले आणि त्यांना मारहाण केली गेली.

हे ही वाचा...

जामीया मिलीया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनावर पोलिसांचा लाठिचार्च

ममता बॅनर्जी यांची CAB विरोधात मेगा रॅली

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशातील बंधुभाव नष्ट होईल – अब्दुर रहमान

जामिया विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईविरोधात केलेल्या याचिकेची तातडीने सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात निदर्शनांदरम्यान पोलिसांनी महाविद्यालयाच्या आवारात अश्रू गोळ्यांचा मारा केल्यामुळे विद्यार्थी, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह किमान १०० जण जखमी झाले.

दक्षिण दिल्लीच्या काही भागात पोलिसांविरोधात झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांची ही कारवाई झाली. तेथे मथुरा रोड, न्यू फ्रेंड्स कॉलनी, जामिया नगर आणि सराय जुलेना येथे शेकडो निदर्शक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या आंदोलनात किमान सहा बस आणि ५० हून अधिक वाहने जाळण्यात आली आहेत.

गेल्या शुक्रवारी कॅम्पसच्या बाहेर नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर 27 जणांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर राष्ट्रीय राजधानीतील हा दुसरा भडका उडाला आहे. त्यात जामियाचे विद्यार्थी आणि स्थानिक रहिवासी सहभागी होते. हैदराबादमधील मौलाना आझाद उर्दू विद्यापीठ, अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि पश्चिम बंगालच्या जाधवपूर विद्यापीठासह देशभरात आंदोलनाचा भडका हा उडाला आहे.

Similar News