HSC Result 2023 Live Update : बारावीचा निकाल पहायचा कुठं? जाणून घेण्यासाठी पहा...

आज बारावीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. पण हा निकाल नेमका पहायचा कसा? जाणून घेण्यासाठी वाचा...

Update: 2023-05-25 05:28 GMT

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून गुरुवारी दुपारी 2 वा. बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील माहिती बोर्डाकडून जाहीर करण्यात आली आहे.

स्टेट बोर्डाने जारी केलेल्या पत्रकात फेब्रुवारी-मार्च 2023 या परिक्षांचा निकाल 25 मे रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याचे म्हटले आहे.

यामध्ये महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण, मुंबई, कोल्हापूर व लातूर या नऊ विभागीय मंडळामार्फत दुपारी 2 वाजता निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार असल्याचे म्हटले आहे.

हा निकाल पाहण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने खालील लिंक जारी केल्या आहेत.

1) mahresult.nic.in

2) https://hsc.mahresults.org.in

3) http://hscresult.mkcl.org

विद्यार्थ्यांनी निकाल डाऊनलोड करण्यासाठी www.mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं बोर्डाने म्हटले आहे. त्याबरोबरच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांचा एकत्रित निकाल पाहण्यास मिळेल, असं बोर्डाने म्हटलं आहे.

Tags:    

Similar News