मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई कुठपर्यंत आली आहे?: विनोद पाटील

Update: 2020-06-24 17:12 GMT

एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी अख्खा महाराष्ट्र हादरुन गेला होता. आरक्षणासाठी मराठा समाजाने शांतीच्या मार्गाने काढलेल्या मोर्च्यांची नोंद ही इतिहासजमा झाली. सध्या मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई सुरु आहे. ती जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

येत्या ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधातील मूळ याचिका आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीसाठी राज्य शासनाने आपली तयारी पूर्ण केलेली आहे.

एकंदरित मराठा समाजाची आरक्षणासाठी सुरु असलेली लढाई आणि कायदेशीर प्रवास यावर याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे विश्लेषण...

Similar News