संसदेच्या अधिवेशनापूर्वी सरकारची चिंता वाढली, अमित शाहा एम्समध्ये भरती

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.

Update: 2020-09-13 04:08 GMT

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला होता. पण शनिवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात एडमिट करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर १३ दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यानंतर ३१ऑगस्ट रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. पण शनिवारी रात्री पुन्हा एकदा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एम्समध्ये भरती करण्यात आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाहा यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याने सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. प्रश्नोत्तराचा तास रद्द केल्याने विरोधकांनी याआधीच आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे संकट, घसरलेली अर्थव्यवस्था या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत , त्यामुळे अमित शाहांची संसदेतील अनुपस्थित सरकारला चांगलीच जाणवण्याची शक्यता आहे.

Similar News