लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना घरीच क्वारंटाईन करणार: तुकाराम मुंढे

Update: 2020-07-28 13:53 GMT

नागपुरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळं आता महानगरपालिकेनं Corona Positive लक्षणं नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतची माहिती दिली.

मात्र, कोरोना ची लागण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना तसंच विविध आजारानं ग्रस्त नागरिकांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत महानगरपालिकेनं शहरातील स्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी सूचना काढल्या.

या सुचनेनुसार यापुढं लक्षणं नसलेल्या कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच योग्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलाय. वैद्यकीय अधिकाऱ्याने लक्षणं नसल्याबाबत सदर रुग्णाला प्रमाणित करणे आवश्‍यक आहे.

रुग्णाच्या घरी त्यांच्या विलगीकरणासह कुटुंबातील व्यक्तींकरिता अलगीकरणासाठी योग्य सोयी-सुविधेची उपलब्धता आवश्‍यक असल्यास या रुग्णांना घरी ठेवता येईल. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत महानगरपालिकेने शहरातील स्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी काढलेल्या सुचनांनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यानं लक्षणं नसल्याबाबत सदर रुग्णास प्रमाणित करणं आवश्‍यक आहे.

रुग्णाच्या घरी त्यांच्या विलगीकरणासह कुटुंबातील व्यक्तींकरिता अलगीकरणासाठी योग्य सोयी-सुविधेची उपलब्धता आवश्‍यक आहे. गंभीर आजारानं ग्रस्त आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या रुग्णांना घरी विलगीकरणात ठेवण्यात येणार नाही.

60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले वयोगवृद्ध रूग्णांची तसंच इतर आजारी रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यानं तपासणी केल्यानंतरच त्यांना गृहविलगीकरणाची परवानगी देण्यात येईल.

Similar News