मुंबईला एका बुस्टर डोसची गरज- जितेंद्र आव्हाड

Update: 2020-05-21 03:15 GMT

देशभरात कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या आर्थिक संकट उभे राहिले आहे. तसंच कोट्यवधी मजुर आणि कामगारांचा रोजगारही ठप्प झाला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईसुद्धा ठप्प झाली आहे.

हे ही वाचा...


'दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी!' जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Exclusive: पंकजा मुंडे यांना पक्षाने उमेदवारी का नाकारली? पहा काय म्हणाले सुरेश धस

घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत: अजित पवार भाजपवर संतापले

अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का !

सध्या मुंबईत कोरोनाचं हॉटस्पॉट असलेल्या धारावीमधील परिस्थिती तर गंभीर झाली आहे. पण याच पार्श्वभूमीवर धावारीच्या पुनर्विकासाची हीच वेळ योग्य असल्याची भूमिका नुकतेच कोरोनामधून बरे झालेले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे. आव्हाड यांनी एक ट्विट केले असून “धारावीच्या पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ आहे.रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक उलाढालीला सुरूवात होईल. व्हेंटिलेटरवर असलेल्या बांधकाम उद्योगाला जीवनदान मिळेल. मुंबईला एका बुस्टर डोसची गरज आहे, तो धारावीचा पुनर्विकास आहे आणि मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.” असं जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

#धारावी_पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ आहे

रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील

आर्थीक उलाढाली ला सुरवात होईल

व्हेंटिलेटरवर असलेला बांधकाम उद्योग ला जीवन दान मिळेल

मुंबई ला एका बुस्टर डोस ची गरज आहे तो #धारावी_पुनर्विकास असेल

मी ह्या बाबत @OfficeofUT ह्यांना पत्र लिहिले आहे

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 20, 2020

 

Similar News