हिंगणघाट जळीत प्रकरण : आरोपी विकी नगराळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Update: 2020-02-08 06:19 GMT

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट जळीत प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी झाली. आरोपी विकी नगराळेला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आरोपी विकी नगराळेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

न्यायाधीश रत्नमाला डफरे यांनी आज सकाळी 6 वाजता झालेल्या सुनावणीत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आज सकाळीच लवकर सुनावणी घेण्यात आली. या अगोदर आरोपीला न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

3 फेब्रुवारी ला विकी नगराळे ने एका शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला भरचौकात जाळले होते. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली असून तिच्यावर नागपुरात उपचार सुरु असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

Similar News