देशात २६ दिवसात कोरोनाचे ३ लाख १८ हजार नवे रुग्ण

Update: 2020-06-27 10:09 GMT

देशात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे ट. गेल्या 24 तासात 18 हजार 522 नवे रुग्ण आढळले आहेत. एक जूनपासून 26 जूनपर्यंत देशामध्ये तब्बल तीन लाख 18 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

तर गेल्या चोवीस तासांमध्ये 384 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 16 हजारांच्या जवळ जाऊन पोहोचलेली आहे. चोवीस तासात 18 हजार 522 नवे रुग्ण आढळल्याने आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या पाच लाखांच्यावर गेली आहे.

चिंता वाढवणारी ही सगळी आकडेवारी असली तरी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या देखील तीन लाखांच्या आसपास पोहोचलेले आहे. सध्या देशात दोन लाख 95 हजारांच्यावर रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.

तर एक लाख 85 हजार 397 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 15 हजार 685 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. दरम्यान सध्या दर दिवसाला कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण दोन लाखांच्यावर गेल्याची माहिती ICMR ने दिलेली आहे आणि आता लवकरात लवकर हे चाचण्यांचे प्रमाण दर दिवसाला चार लाखांवर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Similar News