मुंबई- महाराष्ट्रात मुसळधार

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबईत अतिवृष्टी सुरु असून पुढील दोन दिवसात महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज आहे.

Update: 2021-09-13 03:30 GMT


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यानं मुंबईसहीत ठाणे आणि उपनगरांमध्ये रात्रभर पाऊसधार सुरु होती. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. राज्याच्या काही भागांत १३ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. १३ सप्टेंबर रोजी पहाटे सहा ते दुपारी १२ दरम्यान मुसळधार होईल असं हवामान विभागानं सांगितलं.

भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक (पश्चिम विभाग) कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार १३ सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता टीपण्यात आलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार दक्षिण गुजरातबरोबरच उत्तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधी अनेक भागात अतिवृ्ष्टी अपेक्षीत आहे. विदर्भामध्येही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये हलक्या सरी कोसळतील असा अंदाज असल्याचं होसाळीकर यांनी म्हटलं आहे.


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे गुजरातच्या परिसरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मोसमी पावसाची आस असलेला हा पट्टा गुजरातपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १३ सप्टेंबरला राज्याच्या सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.

Full View

Tags:    

Similar News