राहुल आणि प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Hathras rape case: Rahul, Priyanka taken into custody, stopped from visiting Hathras

Update: 2020-10-01 11:55 GMT

संपूर्ण देशात हल्लकल्लोळ झालेल्या उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील बलात्कार आणि मृत्त्युच्या घटनेनंतर गुरूवारी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राहूल गांधी आणि प्रियांका गांधी पिडीतेच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी जात असताना यमुना एक्सप्रेसजवळ उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी राहुल गांधींना धक्काबुक्की झाली. गाडी सोडून राहुल गांधी पायीच हाथरसच्या दिशेने निघाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केल्यानंतर देशभरातून कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

राहुल गांधी यांना कलम 188 अंतर्गत अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अटकेनंतर राहुल गांधींनी तुम्ही मला का आणि कोणत्या कलमांतर्गत अटक करत आहात, असा प्रश्न राहुल गांधी यांनी अटकेपूर्वी पोलिसांना केला होता. परंतु कलम 144 लागू असल्याने आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, असं उत्तर पोलिसांनी त्यांना दिलं. यानंतर काही वेळाने राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली. तत्पूर्वी हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी दिल्लीवरुन हाथरसच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र यमुना एक्सप्रेसजवळ त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला.

त्यानंतर राहुल आणि प्रियंका यमुना एक्स्प्रेस वेवरुन हाथरसला पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. या ठिकाणीही पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखले. यावेळी " ये देखो आज का हिंदुस्तान," असं राहुल गांधीनी सांगितलं.पोलिसांच्या धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधी यांचा तोल जाऊन जमिनीवर पडले. त्यांच्या हाताला मुकामार लागला. यानंतर प्रियांका गांधी काहीशा घाबरल्या. झाल्या प्रकरणावर बोलताना ‘अशा घटनांवेळी असे प्रकार होत असतात’ , अशी संयमी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.त्याचवेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले.

यानंतर उठून ते पुन्हा चालू लागले.राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमध्ये येणार असल्याने, हाथरस जिल्ह्याची सीमा आज (1 ऑक्टोबर) पूर्णपणे सील करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मी एकटाच हाथरसच्या दिशेने जात आहे, त्यामुळे कलम 144 चा भंग होण्याचा प्रश्न नसल्याचे राहूल गांधीनी स्पष्ट केलं आहे. एकंदरीत राहुल गांधींची अडवणुक पोलिसांकडून झालेली मारहणाच्या मुद्द्यावर देशभरातील कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ते केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत.

Similar News