हाथरस सामूहिक बलात्कार, योगी सरकारची लपवाछपवी

Update: 2020-09-30 13:20 GMT

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी कारवाईसाठी आता उत्तर प्रदेश सरकारला जाग आली आहे. या प्रकरणी ३ सदस्यांची एसआयटी स्थापन केल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. ही समिती ७ दिवसात आपला अहवाल सादर करेल, असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.

सफदरजंग हॉस्पिटलमध्ये या तरुणीवर उपचार सुरू होते. पण उपचारा दरम्यान तिचे निधन झाले. पोलिसांनी गावात तिचा मृतदेह आणला पण कुटुंबीय किंवा गावकऱ्यांच्या ताब्यात न देता पोलिसांनीच त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन टाकले, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

इंडिया टुडेच्या पत्रकार तनुश्री पांडे यांनी या मुलीचे अंत्यसंस्कार पोलिसांनी केले तेव्हा तिथे जाऊन पोलिसांना जाब विचारला. पण पोलिसांनी त्यांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिले नाही.

 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल अशी घोषणा केली आहे. पण पोलिसांनी त्या तरुणीचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात का दिला नाही याची चौकशी एसआयटी करेल का याबाबत उत्तर प्रदेश सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही.

Similar News