लोकसभा निवडणुकीची तारीख ठरली का ? व्हायरल झालेल्या पत्रावर निवडणूक कार्यालयाकडून खुलासा

Update: 2024-01-23 14:18 GMT

व्हायरल झालेलं पत्र आणि खुलासा

लोकसभेच्या निवडणुकीची तारीख एप्रिल १६ अशी ठरली का ? असा प्रश्न एका पत्रामुळे निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत संवादाचं पत्र व्हायरल झालं आहे. प्रत्यक्षात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अशी कोणतीही अधिकृत तारीख ठरली नाही. कारण अशा तारखेची घोषणा केवळ पत्रकार परिषदेमध्ये आयोगाचे मुख्य आयुक्त करत असतात. आणि तीच अंतिम मानली जाते. मात्र सोशल मीडियावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत संवादाचं पत्र व्हायरल झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या संभावित तारखेबद्दल चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेत अजिबात तथ्य नसल्याचा खुलासा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या दिल्ली कार्यालयाच्या CEO Delhi Office या एक्स अकाऊंटवरून केलेल्या पोस्टमध्ये करण्यात आलाय. या पोस्टमध्ये व्हायरल झालेली एप्रिल १६ ही तारीख केवळ संदर्भासाठी आणि निवडणूक पार पाडण्याकरिता जी प्रक्रिया अगोदर पूर्ण करायची असते, त्यासाठी असल्याचं म्हटलं गेलय. व्हायरल झालेल्या पत्रातल्या तारखेवर अनेक माध्यमांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाला विचारणा केल्याचं देखील एक्स पोस्टमध्ये म्हटलं गेलय. सोशल मीडियावर व्हायरल झालेलं पत्र हे खरे असून त्यात नमूद केलेली १६ एप्रिल ही तारीख केवळ संदर्भासाठी असल्याचं सांगण्यात आल्यामुळे चर्चेला विराम मिळण्याची शक्यता आहे. हे पत्र सहायक मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या नावाने दिल्लीच्या ११ जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या नावाने जारी झाले आहे. आणि याच पत्रात केंद्रीय निवडणूक आयोगाने एप्रिल १६ अशी टेंटेटिव्ह तारीख केवळ संदर्भासाठी दिली असल्याचं म्हटलं गेलं आहे.




 


व्हायरल झालेलया पत्राची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेची तिसरी टर्म पूर्ण करणार असा विश्वास भाजप वारंवार व्यक्त करत आहेत. आणि त्यासाठी मोदींच्या सभा जरी सुरु झाल्या नसल्या तरी आपल्या भाषणातून केलेल्या कामाची यादी शक्य तिथे सांगून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपशिवाय जनतेला पर्याय नसल्याचं ते वारंवार सांगताहेत. यावरून निवडणुकीसाठी भाजप हा तयार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे निवडणुकीची तारीख नेमकी कधी जाहीर केली जाते याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. आणि यावर सुद्धा देशभरात अनेक पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. कारण अनेक पक्षांची त्यासाठी तयारी सुरु आहे. खासकरून भाजप आणि मोदी यांना टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडी ज्या पद्धतीने सरसावली आहे. त्यावरून निवडणुकीसाठीची अनेक पक्षांची तयारी आपल्याला दिसून येतेय. आता निवडणुकीच्या तारखेची केवळ प्रतिक्षा आहे बाकी आहे. त्यासाठीच्या तयारीला केंद्रीय निवडणूक आयोग पूर्ण ताकदीने लागला असून संबंधित यंत्रणांकडून तयारीचा दैनंदिन आढावा सुद्धा घेतला जाणार आहे. असे या व्हायरल झालेल्या पत्रावरून तरी आपल्याला समजू शकतं.

Tags:    

Similar News