चीन ने आपला प्रदेश बळकावलाय का?: ओवेसी

Update: 2020-06-08 10:01 GMT

लडाखमध्ये सीमेवर भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेला तणाव अजूनही कायम आहे. डिप्लोमेटिक आणि लष्करी पातळीवर चर्चेच्या माध्यमातून या वादावर तोडगा काढण्य़ाचा प्रयत्न केला जात असल्याचं सरकार सांगत आहे. या सर्व प्रकरणावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी चीननं आपला प्रदेश बळकावला आहे का? असा सवाल सरकारला केला आहे.

“चीनसोबत कोणती चर्चा झाली. याची माहिती केंद्र सरकारनं द्यायला हवी. ते शांत का आहेत? जर चीननं आपला प्रदेश बळकावला नाही, तर सरकार त्यांच्याशी काय चर्चा करत आहे. देशाला याची माहिती मिळाली पाहिजे. केंद्र सरकारनं याबाबत माहिती द्यायला हवी. सरकार शांत का आहे?''

यावेळी त्यांनी केंद्र सरकारनं लागू केलेला लॉकडाउन अयशस्वी झाला असल्याची टीका केली आहे.

Similar News