...तर भाजपने आंबेडकरांना देखील पाकिस्तान समर्थक म्हटलं असतं: महबूबा मुफ्तींचा भाजपवर संताप

Update: 2021-06-14 04:35 GMT

courtesy social media

जम्मू कश्मीर मधील कलम 370 हटवल्यानंतर पुन्हा एकदा कलम 370 वरुन वादाला तोंड फुटलं आहे. सध्या दिग्विजय सिंह यांचा आवाज असलेली कथित Audio क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यामध्ये जर कॉंग्रेसचं सरकार आलं तर जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा एकदा 370 कलम आम्ही लावू. ही कथित Audio क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपने कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.

या सगळ्यामध्ये आता पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी आज जर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवंत असते तर भाजपने त्यांना पाकिस्तान समर्थक असल्याचा शिक्का मारला असता. कलम 370 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाने मान्यता दिली होती. मात्र, भाजपने ती नष्ट केली.

5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकारने कलम 370 रद्द करत जम्मू आणि काश्मीर राज्याचं विभाजन केलं होतं. कलम 370 रद्द करताना केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतला होता.तेव्हापासून या ठिकाणी राष्ट्रपती शासन लावण्यात आलं आहे.



जम्मू आणि काश्मीरचं विभाजन करताना राज्य सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा कायम ठेवली आहे. तर केंद्रशासीत प्रदेश लडाखमध्ये विधानसभा नसेल असं जाहीर केलं होतं. मात्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेची निर्मिती केली असली तर या ठिकाणी अद्यापपर्यंत निवडणूका झालेल्या नाहीत.

दरम्यान कॉंग्रेसचं सरकार आलं तर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा 370 कलम आम्ही लावू. आणि जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा बहाल करु अशी दिग्विजय सिंह यांची कथित Audio क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपने कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. यावर भाजपने दिग्विजय सिंह यांचं हे वक्तव्य पाकिस्तान सोबत कॉंग्रेसची 'मिलीभगत' असल्याचा एक पॅटर्न आहे.

या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपामध्ये भाजप सोबत सत्तेत राहिलेल्या पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. बरं झालं आंबेडकर जिवंत नाही. नाहीतर या भाजपवाल्यांनी त्यांनाही पाकिस्तान समर्थक म्हणत बदनाम केलं असतं.

Tags:    

Similar News