तिस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS ने घेतलं ताब्यात

Update: 2022-06-25 14:12 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २००२च्या दंगलप्रकरणी क्लीन चिट देणारा SITचा रिपोर्ट, सुप्रीम कोर्टाने कायम ठेवल्याने पंतप्रधान मोदी यांना दिलासा मिळाला आहे. पण या निकालाला २४ तास पूर्ण होत नाहीत तोच मोदींवर दंगलीचे आरोप करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्यावर गुजरात एटीएसने कारवाई केली आहे. त्यांना मुंबईमधल्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएसची टीम त्यांना सांताक्रुझ पोलीस स्टेशनला घेऊन गेली.

तत्काली मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाला झाकीया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण कोर्टाने यावर निकाल देत हा एसआयटीचा रिपोर्ट योग्य असल्याचे म्हटले आहे. तसेच तिस्ता सेटलवाड यांच्या एनजीओने दंगलीबाबत खोटी माहिती पोलिसांना दिली असे निरीक्षण कोर्टाने निकालात नोंदवल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. त्यानंतर शनिवारी सेटलवाड यांच्यावर कारवाई कऱण्यात आली. तिस्ता सेटलवाड यांनीच झाकीय जाफरी ज्या घटनेतील पीडित होत्या, त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला, त्यामुळे त्यांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे, असे वृत्त एएनआयने दिले होते.

Tags:    

Similar News