माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार? कोम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या नक्षलविरोधी पोलीस पथकाला मोठं यश

Update: 2021-11-13 16:00 GMT

गडचिरोली // कोम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या नक्षलविरोधी पोलीस पथकाला मोठं यश मिळालं आहे. या मोहिमेमध्ये माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या वृत्ताला पोलीस विभागामार्फत अद्याप तरी अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, या मोहिमेत तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती मिळत आहे. पोलीस-नक्षलवाद्यांत झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाल्याचे समजते. जखमी जवानांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले आहे. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.

आज सकाळी धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरात मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्त घालत होते. दरम्यान या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले. या मोहिमेत जवळपास 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे देखील ठार झाला असल्याची माहिती मिळत आहे. मात्र तेलतुंबडे याच्या मृत्यूने नक्षली चळवळ खिळखिळी झाली आहे,

Tags:    

Similar News