आर्थिक मंदी : देशातील पाच बड्या कंपन्याचं होणार खासगीकरण

Update: 2019-11-21 07:03 GMT

देशावर सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदीचं सावट आहे. देशातील राज्यकर्ते ही बाब जरी मीडियासमोर मान्य करत नसले तरी, देश सध्या आर्थिक विवंचनेत जात असल्याचं दिसून येत आहे.

आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट कमिटीची नुकतीच एक बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत आत्तापर्य़ंतच्या सर्वात मोठय़ा सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाला सरकारने मंजूरी दिली आहे.

या बैठकीत देशातील पाच बड्या कंपन्यांचा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय), कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टीएचडीसी, नेप्पको या मोठ्या कंपन्याचं खासगीकरण करण्यात येणार आहे.

केंद्र सरकार या कंपन्यातील आपला आर्थिक हिस्सा विकणार आहे. केंद्र सरकारची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी डील आहे.

Similar News