‘तो’ वादग्रस्त व्हिडिओ यूट्यूबला काढायला सांगणार - गृहमंत्री

Update: 2020-01-21 15:27 GMT

तान्हाजी सिनेमातील एका दृश्यात शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा चेहरा मॉर्फ करुन तयार केलेला व्हिडिओ काढून टाकण्याच्या सूचना यूट्यूबला देणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. आज के शिवाजी – नरेंद्र मोदी या पुस्तकाचा वाद थांबत नाही तेवढ्यात आता एका व्हिडिओमुळे आणखी नवीन वादाला सुरूवात झालीये.

तान्हाजी सिनेमातील दृश्यांचा वापर करुन तयार केलेला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याऐवजी पंतप्रधान मोदींचा चेहरा मॉर्फ करण्यात आलाय. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हा व्हिडिओ व्हायरल झालाय. पण भाजपनं या व्हिडिओशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय. तर छत्रपती संभाजीराजे यांनी या व्हिडिओवर तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींवर कारवाईची मागणी केलीये. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यामागे भाजपला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप केलाय.

हे ही वाचा...

तर याच मुद्यावरुन आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही उदयनराजे भोसले आणि भाजपला टोला लगावला होता. त्यालाही चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागणाऱ्यांना शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याची अधिकार नाही असा टोला लगावला आहे.

Similar News