व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून नवीन वर्षाचं गिफ्ट

जागतिक मंदीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकार नव्या उद्योजकांना काय भेट देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यापार्श्वभुमीवर केंद्र सरकारने उद्योजकांना नववर्षाची भेट जाहीर केली आहे.

Update: 2023-01-03 05:16 GMT

आगामी काळात जगावर मंदीचे संकट येण्याची भीती अनेक अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने उद्योगविश्वाला दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात होती. त्यापार्श्वभुमीवर केंद्र सरकारने नव्या उद्योजकांना नववर्षाची भेट दिली आहे.

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने नव्याने स्थापन झालेल्या उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलतीच्या कर प्रणाली अंतर्गत करात सवलत देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, काही देशांतर्गत कंपन्यांसाठी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नात देशांतर्गत उत्पादन करण्यासाठी 15 टक्के सवलत कर व्यवस्था लागू केली आहे. त्यामुळे 31 मार्च 2023 ते 31 मार्च 2024 या काळात नव्याने उत्पादन सुरु करणाऱ्या उत्पादन कंपन्या प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 115BAB नुसार 15% सवलतीच्या कर अकारणीसाठी पात्र असतील, असं केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे नव्या उद्योजकांसाठी ही नववर्षाची भेट मानली जात आहे. याबरोबरच हे आम्ही दिलेले प्रॉमिस पूर्ण केल्याचेही या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Tags:    

Similar News